एमआयएम खासदार इम्तिजाय जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकासआघाडी सरकारला युतीची ऑफर दिली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून जोरदार टीकाही केली आहे. एमआयएम पक्षासोबत युती हा विचारही एक गंभीर आजार आहे. राज्यात महाविकासआघाडी भक्कम आहे. जो पक्ष औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकतो. जाऊन गुडघे टेकतो. तो शिवसेना, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेचा विरोधकच आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.